एस.टी.केबिन मधून चोरी....
एस.टी.केबिन मधून चोरी....
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः पनवेल एस.टी.आगारात फलाट क्र.1 येथे उभ्या केलेल्या चालकाच्या केबिनमधून काही वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
एस.टी. आगार फलाट क्र.1 मध्ये उभी केलेली एस.टी.क्र.एमएच-20-बीएल-2753 च्या चालक केबिनमधून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, बालाजी कंपनीची तिकिट मशिन, ओळखपत्र, वाहन परवाना, बॅच, बिल्ला, पंचिंग मशिन, सॅग असा मिळून जवळपास 5 हजार 100 रुपये किंमतीचा माल चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments