घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास...…..
घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास......

पनवेल दि. ११ (संजय कदम)- बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोखरक्कम असा मिळून जवळपास 3 लाख 82 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
          कामोठे वसाहतीमधील से-19 शिवसागर सिएचएस रूम नं-101 येथे राहणारे अजित कमलकार हे त्यांच्या पत्नीसह सासुरवाडीस गेले असताना त्यांचा मेव्हणा प्रथमेश हा कामोठ्याच्या घरात होता. तो सकाळी कामाला गेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोखरक्कम असा मिळून जवळपास 3 लाख 82 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments