व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या......
व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या.....

पनवेल दि. २५ (वार्ताहर): पनवेल शहरात कांदा बटाटा विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
        शहरातील बावन बंगला येथील निळकंठ गार्डन, बी-202 येथे राहणारे ज्ञानेश्वर गिरे (वय-48) यांनी राहत्या घरातील हॉलला असलेल्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
Comments