फक्त ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव जहागीरदार यांच्या मुलीचा लग्नाचा सोहळा पडला पार....
    

पारनेर :  पनवेल आणि नवी मुंबईतील प्रसिद्ध 4k चॅनल आणि साप्ताहिक गौरव दर्शनचे संपादक गौरव जहागीरदार यांच्या मुलीचे  लग्न  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथे दि.18 जुलै रोजी फक्त  50 मान्यवरांच्या उपस्थित पार पाडले. 
कोरोनाचे संक्रमण आणि शासनाचे निर्बंध असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कामोठे ( नवी मुंबई)  येथे न करण्याचे ठरवले होते, तसेच हा  लग्न सोहळा  एकदम साधेपणाने  करण्याचे ठरवले होते म्हणून  फक्त मोजक्याच 50 आप्तांना निमंत्रित  केले होते. या लग्न सोहळ्या प्रसंगी  सोशल डिस्टन्स ठेवून आणि शासनाचे नियम पाळून  छोटेखानी लग्न सोहळा झाला.  

गारखिंडी ( ता.पारनेर )  येथील  प्रगतशील शेतकरी श्री बबनराव लक्ष्मण शिंदे यांचे चिरंजीव विकास  बबनराव शिंदे यांच्या बरोबर निकिता चा विवाह संपन्न झाला. श्री. विकास बबनराव शिंदे हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून पनवेल मध्ये त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.या वेळेस सर्वांना मास्कचे वाटप आणि सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
जहागीरदार आणि शिंदे परिवार तर्फे जास्त  कोणालाही या लग्नाचे आमंत्रण देऊ न शकल्या  मुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Comments