इनरव्हील क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी वृषाली सावळेकर ; निता बोराडे सेक्रेटरी तर शुभांगी वालेकर ट्रेझरर

पनवेल, दि.१६ (वार्ताहर) :-  इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी डॉ. शोभना पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्लब मेंबर बिजल मिरानी हिने स्त्रीच्या विविध रूपांचे सुंदर भावमुद्रण, गणेशवंदना करून सादर केले. मावळत्या अध्यक्षा ध्वनी तन्ना यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सर्व पदाधिकारी यांनी आपापले अहवाल सादर केले.  मावळत्या अध्यक्षा ध्वनी तन्ना यांनी नुतन अध्यक्षा वृषाली सावळेकर यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे सोपविली.
’पिंक फस्ट या वर्षीच्या थिमला अनुसरून गरजू महिलांना सक्षम करणे, कॅट्रॅक सर्जरी, वृक्षसंवर्धन , टाकाऊ वस्तूंचे रिसायकलिंग इत्यादी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे.शितल गायकवाड  संपादित ’प्रतिबिंब’ या क्लब बुलेटिन चे  प्रकाशन डॉक्टर शोभना पालेकर यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात11 नवीन सदस्यांना क्लबचे सदस्यत्व देण्यात आले. ब्लिस फाउंडेशन या अनाथ आश्रमातील मुलांना डॉ. जयश्री पाटील यांनी भेटवस्तू दिल्या. क्लबतर्फे धान्य, खाण्याचे पदार्थ देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.  डिस्ट्रीक्ट चेअरमन संतोष सिग यांनी आवर्जून क्लबसाठी संदेश आणि शुभेच्छा पाठवल्या. प्रमुख पाहुण्या डॉ. शोभना पालेकर यांची ओळख चार्टड प्रेसिडेंट शुभांगी वालेकर यांनी करून दिली. डॉ. पालेकर यांनी आपल्या भाषणात केवळ पाच वर्षात क्लबने केलेल्या सर्वांगीण प्रगतीचे भरभरून कौतुक केले. शिवाय अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आणि  क्लबला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  
वैशाली म्हात्रे यांनी आपल्या खास शैलीत आभार प्रदर्शन केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन शुभदा भगत यांनी  अतिशय उत्तम प्रकारे केले. यावेळी रोटरी प्रेसिडेंट गुरुदेवसिंग कोहली, ट्रस्टचेअरमन डॉ. एन. सी. जनार्दन, पी पी अरविंद सावळेकर, जितेंद्र बालड,  तसेच इतर इनरव्हील क्लबचे प्रेसिडेंट,  सेक्रेटरी, क्लब मेंबर्स उपस्थित होते. यावेळी प्रेसिडेंट- वृषाली सावळेकर, सेक्रेटरी -निता बोराडे, आयपीपी- ध्वनी तन्ना, व्हाईस प्रेसिडेंट- सोनाली परमार, जॉइंट सेक्रेटरी- शुभदा भागत, ट्रेजरर - शुभांगी वालेकर, आयएसओ - ज्योती गुंदेचा, सीसीसीसी- वैशाली म्हात्रे, सीसी- स्नेहल गोवेकर, एडिटर - शीतल गायकवाड, एडवायझरी कमिटी - डॉ. साधना गांधी, डॉ. जयश्री पाटील, ममता ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली.

Comments