खारघर येथील डोंगरात नागरिक फिरावयास गेल्यास कडक कारवाई करणार ; वपोनि शत्रुघ्न माळी...

पनवेल / वार्ताहर :- खारघर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी फलक, सोशल मिडीयाव्दारे , प्रेस, व बंदोबस्तसाठी असलेले पोलिसांनी वेळोवेळी सांगुन सुध्दा काही नागरीक विशेष करून महिला या पोलिसांची नजरचुकवून आड मार्गाने खारघर डोंगरात जातात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
काल सायंकाळी गोल्फ कोर्सच्या मागील नाल्यास पावसामुळे अचानक वाढ झाल्याने डोंगरात फिरावयास गेले 116 इसम त्यात 78 महिला 5 मुले हे पलिकडे अडकल्याची माहिती खारघर पोलिस ठाण्यांत मिळाल्याने फायर ब्रिगेडच्या जवानांच्या साह्याने सर्वाना सुखरूप बाहेर काढण्यात आले.अडकलेल्या सर्वानी फायर ब्रिगेड खारघर व नवी मुंबई पोलीसचे आभार मानले.
नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन खारघर पोलीस स्टेशनचे वपोनी शत्रुघ्न माळी यांनी केले असुन कोणी डोंगरात आढळुन आल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
Comments