गावातील तब्बल ५०० नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस......

पनवेल(प्रतिनिधी) भारतातील सर्वात वेगाने वाढणार्‍या मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट अप्सपैकी एक असलेल्या रुनाया समुहाने, कोविड-१९ संकटावर मात करण्यात सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होत अलिबाग तालुक्यातील नवेदार नवगाव गावात एक लसीकरण मोहीम राबविली.यामध्ये तब्बल ५०० नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला. 

रायगड जिल्ह्यात विशेषत: अलिबाग भागात, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ही बाब लक्षात घेत, कंपनीने ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्टशी करार करून नवेदार नवगाव या गावात सुमारे ५०० नागरिकांना लसी देण्याची व्यवस्था केली. या उपक्रमामुळे येथील बहुतांश ग्रामस्थांना कोविड लसीचा पहिला डोस मिळू शकला. वेदांत समुहाचे उपाध्यक्ष नवीन अग्रवाल यांचे पुत्र आणि‘रुनाया’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनन्य आगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाविषयी बोलताना अनन्य अग्रवाल म्हणाले, “सध्याच्या कोरोना साथीच्या काळात ‘रुनाया’तर्फे हे समाजहिताचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात या भागात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आम्ही येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आमच्या या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा मला आनंद आहे. पुढील काही दिवसांत आम्ही आपल्या समाजाच्या हितासाठी अशा आणखी लसीकरण शिबिरांचे आयोजन करणार आहोत.”

सोमवारच्या लसीकरण मोहिमेत नवेदार नवगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शेखर बाली आणि नवेदार नवगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी प्रार्थना भोईर हे उपस्थित होते.

यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रार्थना भोईर यांनी म्हंटले कि, “प्रत्येकाला वेळेत लस दिल्याने, कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात विजय मिळविण्याची संधी उत्तम प्रकारे साधता येणार आहे. या मोहिमेतून आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे एक कृतीशील पाऊल उचलले गेले. त्याबद्दल आम्ही अनन्य आणि रुनाया समुहाचे आभारी आहोत.”

वेदांत समुहाचा एक महत्त्वपूर्ण भागीदार असलेला रुनाया समूह हा नैसर्गिक संसाधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. ही कंपनी शाश्वत व्यवसाय पद्धतींवर भर देते. स्थानिक समुदायांच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी तिने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात केलेल्या या लसीकरण मोहिमेमुळे एक सामाजिक बांधिलकीचा उत्तम उदाहरण पाहण्यास मिळाले आहे.
Comments