पनवेल / वार्ताहर :- पायोनियर विभात संघमित्रा सोसायटी जवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे खांब कुचकामी झाले होते आणि ते कोणत्याही क्षणी पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती.ही गंभीर बाब कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या लक्षात येताच कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली व सदर मोडकळीस आलेले खांब त्वरित बदली करण्यात यावे यासाठी पत्र सुध्दा दिले.सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर महावितरणच्या वतीने हे दोन्ही मोडकळीस आलेले खांब बदली करण्याचे करण्यात आले.
आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील नेहमी तत्पर असतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.