ग्रामीण समूहांच्या पुनर्वसनासाठी ‘सीएसआर’ उपक्रम...

पनवेल(प्रतिनिधी) :-. टाटा कॅपिटल या टाटा समूहातील प्रमुख वित्तीय सेवा कंपनीने ग्रामीण महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडमध्ये व्यावसायिक विकास प्रकल्पांची मालिका हाती घेतली आहे. या तीन राज्यांमधील समुदायांमध्ये पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी प्रदान करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असून ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत ‘टाटा कॅपिटल’ने 'ग्रीन स्विच' आणि 'जलआधार' हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत.
          या अनुषंगाने ग्रीन स्विच प्रकल्पामध्ये हवामान बदलातील शाश्वतता, आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षण आणि उद्योजकता यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. स्थानिक लोकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचे स्त्रोत पुरवण्याच्या उद्देशाने जलआधार प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातून तांत्रिक एकत्रीकरण आणि समुदायाची सहभाग यांस प्रोत्साहन देण्यात येते. हे दोन्ही प्रकल्प सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडमध्ये कार्यरत आहेत आणि येत्या काही वर्षांत त्यांचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे. 
‘टाटा कॅपिटल’च्या सीएसआर उपक्रमांविषयी बोलताना‘टाटा कॅपिटल’चे सीएसआर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीधर सारथी म्हणाले, “स्थानिक समुदायांवर आणि त्यांच्या परिसंस्थेवर प्रभाव पडेल, अशा प्रकारे वंचितांचे परिवर्तन करण्यास टाटा कॅपिटल वचनबद्ध आहे. भविष्यातील आरोग्यदायी आणि शाश्वत वातावरण निर्माण करण्यासाठी लोकांना नवीन कौशल्ये शिकण्यास सक्षम बनविण्यातस्वयंसेवी संस्थांसोबत, कार्यक्षम तंत्रज्ञानासह काम करण्याच्या आमच्या सहयोगी दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्ही आपले सीएसआर प्रकल्प भारतभर विस्तारित करीत आहोत आणि त्यातून आम्ही लोकांच्या जीवनात व राहणीमानात अर्थपूर्ण बदल घडवून आणत आहोत.”‘जलआधार’ प्रकल्पांसाठी आम्ही अतिरिक्त २५ गावे समाविष्ट केली आहेत, ६५०० हेक्टरवरील जमिनीवर काम केले आहे आणि याचा ३६०० शेतकरी कुटुंबांना फायदा झाला आहे. हे प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या समुदायातील ८० टक्के लोक हे वंचित गटातील होते. टाटा कॅपिटलच्या या प्रकल्पांमध्ये ‘बीएआयएफ इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबललाईव्हलीहूड डेव्हलपमेंट’ (बीआयएसएलडी), ‘नॅशनल अॅग्रो फाउंडेशन’, ‘केशवसृष्टी’, ‘सेवावर्धिनी’ आणि ‘ग्राम ऊर्जा’ या स्वयंसेवीसंस्था सहभागी झाल्या आहेत.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image