अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी धावले शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील ......
पनवेल दि. १० (संजय कदम)- अपघातग्रस्त गाडीतील लोकांच्या मदतीसाठी शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील हे धावून गेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
           शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील हे कर्जतवरुन पनवेल बाजूकडे येत असताना भोकरपाडा येथे टोयोटा ट्र्वेरा गाडीच्या पुढे अचानकपणे दुचाकी आल्याने वाहनचालकाने अपघात होऊ नये यासाठी त्यांच्या गाडीचा अचानकपणे ब्रेक मारला. यात गाडी पलटी झाली. सदर गाडीत सोनावणे कुटूंबिय प्रवास करीत होते व ते कर्जतवरून भाईंदर येथे चालले होते. या गाडीत एकूण सात प्रवासी होते. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील हे आपल्या गाडीतून उतरून त्यांनी मागून येणारी वाहने थांबवली. त्याचप्रमाणे पलटी झालेल्या गाडीतील तीन लहान मुले व चार मोठी माणसे यांना प्रथम बाहेर काढून गाडी सरळ करण्यासाठी त्यांच्यासह त्यांचा चालक आदिल पठाण आणि अंगरक्षक विशाल बोरुडे व ग्रामस्थ धावले. सदर गाडी सरळ झाल्यावर आतील प्रवाशांना काही दुखापत झाली आहे का याची विचारपूस जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी केली. तसेच आवश्यक ती मदत त्यांना करून पुढील प्रवासासाठी त्यांना रवाना केले. शिवसेना ही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते व मदतीला प्रथम नेहमीच शिवसेना व शिवसैनिक धावत जातो याचा प्रत्यय झालेल्या घटनेत जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी दाखवून दिला आहे. 
          
Comments