रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न...

पनवेल / वार्ताहर :-  दि.30/07/2021 रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट -3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.पंकज शहा व रो. डॉ. रमेश पटेल यांच्या उपस्थितीत आज रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. 
     कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.संजय झेमसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत मागील वर्षभरात केलेल्या कार्याचा उल्लेख केला आणि सर्व सदस्यांचे आभार मानले. 
      पदग्रहण सोहळ्यातील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मावळत्या अध्यक्षांनी आपली रोटरी कॉलर नवीन अध्यक्ष रो. विजय निगडे यांच्या गळ्यात घालून  रोटरीचा चार्टर हस्तांतरित करीत नवीन रोटरी वर्षाकरिता रो. विजय निगडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच मावळते सेक्रेटरी  रो. प्रदीप पाटील यांनी आपल्या सेक्रेटरी पदाची कॉलर सेक्रेटरी रो. महेश फुलपगार यांच्या वतीने सह सेक्रेटरी रो. विकास चव्हाण यांच्या गळ्यात घालून शुभेच्छा दिल्या. खजिनदार रो. प्रसाद देशमुख यांनी आपल्या अर्थ विभागाची कागदपत्रे नवीन खजिनदार रो.प्राचार्य. प्रशांत माने यांच्याकडे हस्तांतरित केली.
       याप्रसंगी बोलताना रो. पंकज शहा यांनी नवीन सर्व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या रोटरी वर्षाकरिता शुभेच्छा दिल्या. आणि इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांनी त्यांना दिलेली रोटरी पिन  नवीन प्रेसिडेंट रो. विजय निगडे यांना भेट देत आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या भाषणात त्यांनी रोटरीच्या सामजिक व इतर अनेक  विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नवीन व पुनच्छ रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन मध्ये प्रवेश घेतलेल्या 10 रोटेरियनसचे पिन व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
     नवीन प्रेसिडेंट रो.विजय निगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येणाऱ्या रोटरी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने आनंदी आंगणवाडी च्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आंगणवाडीचे काम करणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी बोटॅनिकल गार्डन तयार करणे व इतर अनेक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
          पदग्रहण कार्यक्रमाकरिता पीडीजी रो. डॉ. शैलेश पालेकर, रो. गणेश म्हात्रे, रो.पुंजाराम थोरात, रो. शिवाजीराव पाटील, रो. विलास कावनपुरे, रो. उमेश लाड, रो.सुनील भोईटे, रो. दिलीप आचरेकर,रो. किशोर निकम व इतर मान्यवर रोटेरियन, सामजिक कार्यकर्ते आणि मित्र मंडळी आपल्या कुटुंबासह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. प्राचार्य. प्रशांत माने यांनी आपल्या चारोळ्या व वकृत्वशैलीने  छान पणे पार पाडले.
Comments