कमोठेतील शेकडो पुरुषांचा जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...

खारघर / प्रतिनिधी  :- शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे शिवसेना कामोठे शहरातील शेकडो पुरुषांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. 

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या हाती शिवबंधन बांधून व त्यांना नियुक्ती पत्र देऊन शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच कामोठे उपशहर प्रमुख पदी विलास कामोठकार, विभागप्रमुख पदी संतोष गोळे तसेच शाखा प्रमुख , उपशाखा प्रमुख व गट प्रमुख पदी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या. पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शिवसेना कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी व कामोठे शहरातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख गट प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments