लोखंडी पोलची अज्ञात चोरट्यांनी केली चोरी.....
लोखंडी पोलची अज्ञात चोरट्यांनी केली चोरी.....

पनवेल दि.24 (वार्ताहर)- लोखंडी पोलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना पनवेल तालुक्यात घडली असून एकूण 157 लोखंडी पोल चोरीस गेल्याने या चोरट्याचा शोध पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.
         बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनी यांची वांगणी तर्फे तळोजे येथे एकूण 134 एकर जमिन आहे. या जमिनीवर असलेले लोखंडी पोल व तारेच्या कुंपणापैकी 157 लोखंडी पोलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची तक्रार कंपनीच्या वतीने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार सदर चोरट्याचा शोध तालुका पोलिस करीत आहेत.
Comments