विलास कामोठकर यांची शिवसेना कामोठे उपशहरप्रमुखपदी नियुक्ती..

पनवेल, दि.१८ (वार्ताहर)- शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते उद्योगमंत्री, संपर्कनेते कोकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांच्या सहमतीने विलास कामोठकर यांची शिवसेना कामोठे उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
         जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते व शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या उपस्थितीत विलास कामोठकर यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.         फोटोः विलास कामोठकर यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह शहरप्रमुख राकेश गोवारी
Comments