मोबाईल चोर गजाआड.....
मोबाईल चोर गजाआड....

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पनवेल एसटी स्टँड परिसरात एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सदर मोबाईल चोरास ताब्यात घेतले आहे.
निशांत मुरले(वय-19) हा बस स्टॉपवर तहान लागल्याने मोबाईल बाजूला ठेवून पाणी पित असताना एजाज शेख या इसमाने सदर मोबाईल चोरून तो पसार झाला आहे. या मोबाईलची किंमत 5 हजार इतकी असून याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी एजाज शेख याला ताब्यात घेतले आहे. याच्या अटकेमुळे मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे  उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments