मा. नगरसेविका नीता माळी यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती....
पनवेल दि. ८ (वार्ताहर)- मा. नगरसेविका नीता सुनील माळी यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
         त्यांनी महिलांविषयी केलेले कार्य पाहता त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार व अशा अनेक महिलांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण करुन महिलांना न्याय देण्याचे कार्य करतील म्हणून संस्थेचे प्रदेश अध्यक्ष किसनराव पाटील यांनी त्यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. या त्यांच्या नियुक्तीबद्दल कामोठे पोलिस ठाण्याच्या वपोनि स्मिता जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments