महाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप....

महाड / ( प्रतिनिधी) पुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारपासून (दि. 24) अन्न-पाण्याचे वाटप सुरू केले. महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. यामध्ये महाडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व काही भिजून, वाहून गेले असल्याने दोन वेळची भूक कशी भागवावी याही विवंचनेत ते आहेत. हे ओळखून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग दुसर्‍या दिवशीही महाडचा दौरा केला आणि तेथील नागरिकांना तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. गुरुकुल शाळेत हा मदतीचा कॅम्प लावण्यात आला आहे, तसेच नागरिकांच्या घरातील आणि व्यापार्‍यांच्या दुकानातील चिखल काढण्यासाठी दोन टँकर अहोरात्र फिरत आहेत. या वेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, युवा नेते वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस बिपीन महामुणकर, राजेश मपारा, अक्षय ताडफळे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, हॅप्पी सिंग आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image