बनावट रबरी स्टॅंप बनवून फसवणुकीचा प्रयत्न.....
बनावट रबरी स्टॅंप बनवून फसवणुकीचा प्रयत्न....

पनवेल दि. १४ (वार्ताहर): एका रूग्णालयाचे बनावट लेटरहेड व रबरी स्टॅंप (शिक्का) बनवून घेण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.        कामोठे वसाहतीमधील माऊली अक्सिडंट एन्ड जनरल रूग्णालयाचे बनावट लेटरहेड तयार करून त्याद्वारे रूग्णालयाचा रबरी स्टॅंप (शिक्का) बनवून घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. याबाबत कामोठे पोलिसांनी या व्यक्तीविरोधात बनावटगिरी केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे व तो गुन्हा नेरूळ पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.
Comments