तळोजा वसाहतीवर तिसर्‍या डोळ्याची नजर...
तळोजा वसाहतीवर तिसर्‍या डोळ्याची नजर....

पनवेल, दि.१ (वार्ताहर) ः तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने फेज एक आणि दोन मध्ये दीडशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर अखेरीस सिडकोकडून पेंधर ते सेन्ट्रल पार्क दरम्यान मेट्रो रेल्वे सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर कामे सुरु आहेत. तळोजा वसाहतीत मेट्रो कार शेड, तळोजा आणि पेंधर मेट्रो स्थानक आहे. या शिवाय नर्सरी, पूर्व प्राथमिक तसेच शाळेच्या संख्येत वाढ होत आहे. तर काही बँका देखील नवीन शाखा उघडण्याच्या तयारीत आहेत. तळोजा वसाहतीच्या विकासात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड आदि विविध गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी शहरातील कोपराकोपर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. तळोजा वसाहत सुरक्षित असावी असा उद्देश समोर ठेवून तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या प्रयत्नाने जवळपास पन्नास लाख रुपये खर्च करुन रस्ते, चौक, वर्दळीचा परिसर शाळामहाविद्यालय, बँका, रेल्वे स्थानक परिसर आदि महत्वाच्या ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहे. सदरचे काम पूर्ण करुन जुलै महिन्यात सर्व कॅमेरे सुरु करण्याचे सिडकोचे प्रयत्न आहेत.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image