पनवेल : कळंबोली येथे बाहेर पार्क केलेली कार का काढली नाही याचा राग मनात धरून दोघांना चार इसमांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याच्या साहाय्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. तजमुल जागीर अन्सारी (वय-52वर्षे), हैदर तजमुल अन्सारी (वय-24वर्षे), अमन तजमुल अन्सारी (वय- 18वर्षे), ईरशाद तजमुल अन्सारी या आरोपींविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबोली येथील प्रवीण राजन दुर्वळे यांनी मारुती स्विफ्ट डिझायर एम एच 01 डिई 3542 ही गाडी सोसायटीच्या गेटवर रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवली होती. यावेळी अमन अन्सारी (वय 18) हा घराच्या बाहेर आला व पार्क केलेली गाडी काढण्यास सांगू लागला त्यावेळी प्रवीण याने दहा मिनिटे थांब जेवण बनवत आहे असे सांगितले. काही वेळाने तरमूल अन्सारी (52) हे घराच्या बाहेर येऊन त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांना शिवीगाळ करू नका असे बोलले असता हैदर अन्सारी, तजमुल अन्सारी, हैदर अमन, इर्शाद यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याच्या साह्याने मारहाण केली. जखमींवर एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत.