ट्रकच्या धडकेने महिलेचा मृत्यू



पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः एका ट्रकची धडक पाठीमागून होंडा अ‍ॅक्टीव्हा गाडीस बसल्याने सदर गाडीवर असलेली महिला गंभीररित्या जखमी होवून मयत झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील नितळस गावाकडे जाणार्‍या फाट्याजवळील तळोजा एमआयडीसी भारत वजन काटा परिसरात घडली आहे.
चैताली महादेव पिलाने (24) या कळंबोली ते एशियन प्रिलॉम इंडस्ट्रीज येथे त्यांच्याकडील होंडा अ‍ॅक्टीव्हा या दुचाकीवरुन जात असताना भारत वजन काटा येथे पाठीमागून येणार्‍या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने यात त्या जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments