शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या रसायनी विभागीय अध्यक्षपदी दत्ता देसाई तर उपाध्यक्षपदी मंगेश घाडगे...

पनवेल(प्रतिनिधी) शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या रसायनी विभागीय अध्यक्षपदी दत्ता देसाई तर उपाध्यक्षपदी मंगेश घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
दत्ता देसाई विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेत असतात तर मंगेश घाडगे सातत्याने सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने ते रसायनी विभागात सुपरिचित आहेत, म्हणून त्यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली असून ती योग्य रित्या पार पाडतील, अशी अपेक्षा शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांनी व्यक्त करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. 
या नियुक्तीबद्दल युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश पालसकर, शिवसैनिक अजित सावंत, रमेश पाटील, संतोष पांगत, सुरेश म्हात्रे, गजानन मांडे, सुरेश पाटील, रविंद्र पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यानी दत्ता देसाई व मंगेश घाडगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Comments