गाडीला ठोकर मारल्याच्या वादातून चालकाला जबरी मारहाण


पनवेल, दि.५ (वार्ताहर) :-  टाटा इंडिगो गाडी घेवून जात असलेल्या चालकास दुसर्‍या गाडीची ठोकर बसल्याने झालेल्या वादावादीतून काही जणांनी सदर चालकाला मारहाण केल्याची घटना तळोजा फेज-01 सेक्टर 10 मधील भुयारी मार्गाच्या जवळ घडली आहे.
मोहम्मद सर्फराज एकराम शेख (33 रा.तळोजा) हे त्यांच्या ताब्यातील टाटा इंडिगो गाडी घेवून तळोजा फेज-1 येथे घरी येत असताना उजव्या बाजूला वळण घेत असताना डाव्या बाजूने ओव्हरटेक करणार्‍या होंडा गाडीची ठोकर त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूस लागून अपघात झाला. यावेळी त्यांची दुसर्‍या गाडीतील विरोधकांबरोबर बाचाबाची झाली. रागाच्या भरात विरोधकांनी त्यांच्या गाडीतून हॉकिस्टीक काढून मोहम्मद शेख यांना मारहाण केली तसेच त्यांचा मोबाईल फोडून टाकला व त्यांच्या गाडीच्या दरवाजाच्या काचा फोडून त्यांच्या गाडीचे नुकसान केले. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
Comments