पनवेल दि.१४ (वार्ताहर)- स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण यांच्या पत्नी सौ. गीता अनिल चव्हाण यांचे अकाली निधन झाले आहे.
ही बातमी संपूर्ण लोकाधिकार परिवारासाठी दु:खद घटना आहे. त्यांच्या पाश्च्यात पती अनिल चव्हाण व दोन मुली आहेत. स्थानीय लो.स. महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते खा. गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांनी शोक प्रकट केला. महासंघाच्या वतीने चिटणीस वामन भोसले यांनी स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहिली व चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.