पटवर्धन वाडा येथील स्टॅम्प काँक्रीटीकरण कामाचे नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते भूमीपूजन...
पनवेल, दि. १० (वार्ताहर) ः पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरीकांना समस्या जाणून त्या साडविण्याचे तसेच त्यांना विविध सुवीधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगरसेविका रुचीता लोंढे यांच्या नगरसेविक निधीमधून प्रभाग क्रमांक १९ मधील पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टँम्प काँक्रिटीकरण होत आहे. या कामाचे भुमीपूजन नगरसेविका रुचीता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.   
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवकांच्या माध्यामातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मधील पटवर्धन वाडा या गल्लीमध्ये ५ सोसायट्यांमध्ये असून, या ठिकाणच्या नागरीकांच्या रस्त्यासंदर्भात अनेक समस्या होत्या. त्यापार्श्‍वभुमीवर नगरसेविका रुचीता लोंढे यांच्या नगरसेवक निधीमधून पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टँम्प काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. या कामांचे मान्यवरांच्याहस्ते भुमीपूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, नंदा ओझे, शरद सोमण, योगेश जोगळेकर, अनिमेष पटवर्धन, दशरथ चोरघे,  निजमपुरकर, तुषार कप्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image