पनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ; महानगरप्रमुख रामदास शेवाळे

पनवेल, १० (वार्ताहर) ः सध्या करोना संकटकाळ सूरु असताना संसर्गजन्य स्थिती असताना लोकांचे आधिच आर्थिक व मानसिक नूकसान झालेले आहे. पनवेल महापालिकेने लावलेल्या मालमत्ता कराचा भार हा लोकांना सहन होण्यासारखा नाही. मानवतेच्या दृष्टीने व सरकारची जबाबदारी समजून करात फार मोठी कपात करुन सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना पनवेल महानगर क्षेत्र महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे. 
पनवेल शहर महानगर पालिका क्षेत्रातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आपल्या कार्यालयाकडून अवाजवी मालमत्ता कर लावण्यात आलेला आहे . सदहू कर हा सन आक्टोबर 2016 पासून आज रोजी पर्यंत लावण्यात आलेला आहे. सिडको महामंडळाने सुद्धा सेवा शुल्क व पाणी पट्टी तथा सिडको हस्तांतरण शुल्क आज रोजीपर्यंत घेत आहेत . एकाच क्षेत्रात सेवेकरीता दोन सरकारी प्राधिकरण कर संकलीत करत असल्या कारणाने सामान्य नागरिकांची लुट होत असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे . तरी आपण सदर मालमत्ता करात पारदर्शकता व नियमीतता आणावी . सिडको महामंडळ व आपण कर व शुल्क संकलनात याबाबत अधिक पारदर्शकता आणावी . पनवेल महापालिका क्षेत्रात एकच असल्या कारणाने आपण ग्रामीण व सिडकोचा शहरी भाग असे वेगवेगळे कर रचनेचे नियम नसावेत , एक पालिका एक कर याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे . सिडको महामंडळ व महापालिका या नगरविकास खात्याच्या अंतर्गत असल्याने आपल्या समन्वयासाठी मेहेरबान मंत्री महोदयांसमोर या संदर्भात बैठक लावणार आहोत. या बैठकीनंतरच मालमत्ता कराची वसूली करावी तोपर्यंत मेहेरबान साहेब करवसूलीला स्थगिती द्यावी., अशी मागणी रामदास शेवाळे यांनी केली आहे. 
फोटो ः रामदास शेवाळे
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image