पोलिस असल्याची बतावणी करून इसमास लुटले......
पोलिस असल्याची बतावणी करून इसमास लुटले

पनवेल दि.०९ (संजय कदम)- पोलिस असल्याची बतावणी करून दोघा अज्ञात इसमांनी एका 60 वर्षीय इसमाच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने काढून घेऊन त्याला लुटल्याची घटना पनवेल येथील करंजाडे येथे घडली आहे.
           
वसंत शेट्टीये (वय-60, से-1 करंजाडे) हे भाजी खरेदी करून घरी परत जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना जवळ बोलवून मास्क व्यवस्थित लावायला सांगून आम्ही पोलिस आहोत व काल एका इसमाला चोराने चाकू मारून त्यांच्या जवळील दागिने काढून नेले आहेत तरी तुम्ही तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने काढून एका कागदाच्या पुडीत ठेवा असे सांगून त्यांना बोलण्यात गुंगवून त्यांच्याजवळ असलेले जवळपास 62 हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेऊन ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे.
Comments