टाटा कंपनीच्या ट्रेलरमधील मालासह अपहार करणार्‍या त्रिकुटास तळोजा पोलिसांनी केले २४ तासात गजाआड......


पनवेल, दि.१६ (संजय कदम) ः टाटा कंपनीच्या ट्रेलरमधील मालासह अपहार करणार्‍या त्रिकुटास तळोजा पोलिसांनी अवघ्या २४ तासात ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीचा पूर्ण माल हस्तगत केला आहे.
तळोजा पोलीस ठाणे गु. र. नं. 176/2021 भादवि कलम 379 या गुन्हयातील फिर्यादी ओमप्रकाश जितेंद्र यादव, वय- 37 वर्षे, धंदा- चालक, रा. अजिंक्य म्हात्रे यांची चाळ, समर्थ नगर, रामवडी, ता. पेण, जि. रायगड यांनी त्यांचे ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर हा मला सह मुंब्रा पनवेल रोड वर, एल अ‍ॅण्ड टी कंपनी समोर  पार्क करून ठेवला असता तो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला म्हणुन पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्याने तात्काळ वपोनि काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि संजय नाळे यांच्यासह सपोनि निकम, पोलीस हवालदार वैभव शिंदे, पोलीस नाईक सचिन पवार, पोलीस नाईक दुर्वास पाटील, पोलीस नाईक अभिजीत दगडे, पोलीस शिपाई महेंद्र गायकवाड यांनी गुप्त बातमीदार व इतर तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता मुंबई नाशिक हायवे लागत भिवंडी येथील सोनाले गावा जवळ सदर ट्रेलर पार्क करून ठेवला असताना मिळून आला. त्यानुसार या पथकाने सापळा रचून सोपान एकनाथ पाटील, वय- 34 वर्ष, रा. सरवली पाडा, पो. सरवली एम.आय.डी. सी, ता. भिवंडी, जि. ठाणे, जिशान खान, इरफान  खान यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या ट्रेलरसह मुद्देमाल असा मिळून जवळपास 45 लाखाच्या आसपास हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुधीर निकम करीत आहेत.
Comments