अलिबाग, जि.रायगड, दि.11 (जिमाका) :- कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हयामधील सर्व वृध्दाश्रम, आदिवासी, अपंग, अंथरुणात असलेले रुग्ण, अशा सर्वांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेशित केले होते.
त्यानुषंगाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत नेरे येथील शांतिवन कुष्ठरोग निवारण केंद्रातील नागरिकांचे लसीकरण आज दि. 11 जून रोजी करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार विजय तळेकर, आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शांतिवन कुष्ठरोग निवारण केंद्रातील प्रमुख कार्यवाह श्री.शिंदे, व्यवस्थापक व कर्मचारी आदि उपस्थित होते.