वृक्ष संवर्धनाने साजरा केला शिवराज्याभिषेक दिन ; सामाजिक संस्था गोल्डन ग्रुपचा अनोखा उपक्रम....
पनवेल / प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकदिनाच्या 347 व्या वर्धापन दिनी पनवेल च्या गोल्डन ग्रुप ने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून महाराजांना आगळी वेगळी मानवंदना दिली. बीजांकुरण प्रकल्पाचे या वेळी उद्घाटन देखील करण्यात आले.
रविवार दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या औचीत्याने वृक्ष संवर्धन आणि बिजांकुरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रक्रमी असणाऱ्या गोल्डन ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोल्डन ग्रुप च्या वतीने यापूर्वी चार वेळा वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोर्बे आणि रिटघर परिसरात संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रम केले आहेत. लावलेले प्रत्येक झाड जगवण्यासाठी ग्रुपचा प्रत्येक सदस्य कटिबद्ध असतो.
      आपण जरी वृक्षारोपण केलं तरीदेखील ते झाड लावल्यानंतर त्याची पाच ते सहा वर्ष निगा राखावी लागते तरच लावलेल्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होते याची जाण असल्याने गोल्डन ग्रुप वृक्षरोपण सोबतच वृक्षसंवर्धन वर देखील जोर देतो. यंदाचे वर्षी गोल्डन ग्रुपच्या वतीने बिजांकुरण कुंड हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आंबा फणस जांभूळ यासारख्या हंगामी फळांच्या बिया मृत्तिका कुंडात रुजविण्यात येणार असून. त्याना अंकुर आल्यानंतर त्यांचे पुन्हा रोपण करण्यात येणार आहे. अशाप्रकारे बिया लावल्यास त्या जगण्याची शक्यता अधिक असते असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
संस्थेचे सर्वेसर्वा निळकंठ भगत यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक पाटील,वसंत भगत,विजय पवार,संजय कदम,अमोल गोवारी,आशुतोष पाटील,प्रकाश भोपि,नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image