मा.नगरसेवक एम.एस.जाधव यांच्या नावाकरिता मा.खा.रामशेठ ठाकूर व आ.प्रशांत ठाकूर यांची महेश साळुंखे घेणार भेट...

पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल नगरपरिषदेचे मा.नगरसेवक एम.एस.जाधव यांचे शहरांतर्गत येणार्‍या रस्त्याला नाव द्यावे या मागणीसाठी मा.खा.रामशेठ ठाकूर व आ.प्रशांत ठाकूर यांची स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे हे भेट घेणार आहेत.
यापूर्वी त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेेवून मा.नगरसेवक दिवंगत एम.एस.जाधव यांचे नाव शहरातील अंतर्गत रस्त्याला देण्याची मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा म्हणून लवकरच मा.खा.रामशेठ ठाकूर व आ.प्रशांत ठाकूर यांची भेट घेवून आपली मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहेत व यांच्या भेटीमुळे लवकरात लवकर सर्व सोपस्कार पूर्ण होवून मा.नगरसेवक दिवंगत एम.एस.जाधव यांचे नाव रस्त्याला देण्यात येईल असा विश्‍वास महेश साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.
Comments