१६ कोटी मुतारी सफाईसाठी न वापरता कोरोना सफाईसाठी वापरावे नगरसेवक विजय खानावकर यांची महापालिकेकडे लेखी मागणी...


कळंबोली / (दीपक घोसाळकर ) :  पनवेल महापालिकेने मालमत्ता कराचा बडका नागरिकांवर लादल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  नुकत्याच झालेल्या महासभेत पनवेल मधील सार्वजनिक व कार्यालयातील मुताऱ्या व शौचालय यांच्या सफाईसाठी तब्बल १६  कोटी रुपयाचा प्रस्तावित निधी करण्याचे ठरवले आहे. सदरचा निधी हा मुतार्‍यांच्या सफाईसाठी न वापरता आगामी काळात येणार्‍या कोरोणाच्या तिसर्या लाटेला थोपवण्यासाठी व त्यावर नियंत्रण व सफाईसाठी वापरण्यात यावा अशी लेखी मागणी कळंबोलीतील पनवेल महापालिकेतील नगरसेवक विजय खानावकर यांनी लेखी पत्रानुसार केली आहे. 
मुताऱ्या व शौचालयाच्या सफाईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी कशासाठी राखून ठेवला असाच प्रश्न आता पनवेलमधील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे नेमकी शौचालय मुतारीची सफाई होणार आहे कि पनवेल महापालिकेच्या तिजोरीची सफाई होणार आहे अशी उलट-सुलट चर्चा आता पनवेलमध्ये झडू लागली आहे.
          सार्वजनिक शौचालय , स्वच्छता ग्रह स्वच्छतेसाठी प्रस्तावीत १६.३४ कोटी निधी येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी वापरण्याबाबत १८ जून रोजी झालेल्या महासभेत पटलावरच्या विषयासंदर्भात सार्वजनिक शौचालय स्वच्छता ग्रह , मुताऱ्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने १६.३४ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे .           येणारी तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक असण्याची शक्यता राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून वर्तीवले जाते . सदर निधी हा लहान मुलांच्या कोविडसेंटर उभारणीसाठी खर्च व्हावा लहान मुले देशाचे भविष्य आहे त्यांचा जीव वाचवणे ही आपली प्राथमिकता असणे गरजेचे आहे .  तिसऱ्या कोरोना लाटेविरोधात लढण्यासाठी बालरोगतज्ज्ञ , सुसज्ज रुग्णालये कळंबोली, कामोठे , खारघर , पनवेल परिसरातील ताब्यात घेणे महत्वाचे आहे. 
सदर निधी महापालिकेने वरील नमूद विषया करता उपलब्ध करून घ्यावा त्याचा उपयोग पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला होणार आहे आपण याबाबत काळजीपूर्वक निर्णय घेण्याचे  एका लेखी पत्रानुसार नगरसेवक विजय खानावकर यांनी पनवेल महापालिकेच्या आयुक्तांकडे केले आहे.
Comments