अबोली महिला रिक्षा चालकांना खोपोली येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...
पनवेल/ प्रतिनिधी
अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी स्वखर्चातून खोपोलीतील अबोली महिला रिक्षा चालकांना तसेच गरजू महिलांना  जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे असलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अबोली महिला रिक्षा चालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी याबाबीचा गांभीर्याने विचार करुन स्वखर्चाने खोपोली येथील रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करुन दिले. 
त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थित होते. ही मदत मिळाल्याबद्दल अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांचे महिला रिक्षा चालकांनी आभार मानले.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image