शिवसेना उपमहानगर प्रमुख लीलाधर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

पनवेल,ता १ (बातमीदार) : शिवसेना पनवेल उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खांदा वसाहत येथे पोलीस,स्वच्छता दूत आणि जेष्ठ नागरिकांना सॅनिटायझर्स व मास्कचे तसेच बालग्राम  आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने खांदा वसाहतीच्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात छोटेखानी  कार्यक्रमांचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास रायगड उप जिल्हाप्रमुख   रामदास पाटील,लीलाधर भोईर,शहर प्रमुख सदानंद शिर्के,उपशहर प्रमुख दत्तात्रय महमूलकर,शाखा प्रमुख जयंत भगत यांच्या हस्ते कोरोनाकाळात फ्रंट वर्कर म्हणून काम करणारे पोलीस,महानगरपालिकेचे स्वच्छता दूत आणि जेष्ठ नागरिक यांना सॅनिटायझर्स व मास्कचे वाटप केले.खांदा वसाहतीमध्ये बालग्राम आश्रमात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
Comments