दिवसा ढवळ्या जबरी चोरी करणारे ४ आरोपी जेरबंद...

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः  दिवसा ढवळ्या जबरी चोरी करून शहरात दहशत पसरू पाहणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रबाळे एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर  1 लाख 22 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 
सूरज रामसजीवन निर्मल वय 23 वर्ष, कुलदीपसिंग वीरेंद्र सिंग वय 26 वर्षं, कौशल सोनपाल वाल्मिकी वय 26 वर्ष आणि राजेश राजाराम यादव वय 26 राहणार भीमनगर झोडपट्टी रबाळे एमआयडीसी असे पकडलेल्या आरोपीची नावे आहे. या चार आरिपोनी संगनमतांनी एका इसमास दिवसा ढवळ्या मारहाण करून त्याच्या जवळ असलेली पैशाने भरलेली बॅग व मोटार सायकल घेउन फरार झाले होते. त्या तील फिर्यादी यांनी 10 गुरुवारी रोजी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केली होती. प्रणय प्रसाद लांबे असे फिर्यादी याचे नाव आहे. प्रसाद लांबे हे रबाळे एमआयडीसी परिसरातील विवा फॅसेलिटी प्रव्हेंट लिमिटेत कंपनीत काम करत आहे. 10 जून रोजी प्रणय लांबे हा 11 च्या सुमारास कंपनीत काम करणाऱ्या मजुरांची 2 लाख 1 हजार इतकी रक्कम घेऊन आपल्या स्वतःच्या मोटारसायकल वरून जात होता. या वेळी काही अज्ञात इसमनीं त्यांना निर्जतस्थळी गाठून त्यांना अडवले आणि मारहाण करत त्याच्या जवळ पैश्याने भरलेले ब्याग घेऊन फरार झाले त्यावेळी आरोपीने पैश्या सोबत मोटारसायकल देखील पळवून घेऊन गेले. मारहाण करून पैशे घेऊन गेल्या नंतर फिर्यादी लांबे यांनी, रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्या नंतर, या गुन्ह्याचा तपास सुरू झाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदशनाखाली त्या सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक 
यशवंत पाटील, पोलीस हवालदार शिवाजी बाबर, संतोष काकडे, वैभव पोळ ,अनिल मोटे , विश्वास काजरोळकर यांनी तपास सुरू केला, हा तपास सुरू झाल्या नंतर, या तपासला वेग आला, तपासात कंपनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांना मदत मिळाली या तपासा दरम्यान फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीतील कामगार सूरज निर्मल हा प्रणय लांबे यांच्या हालचाली वर लक्ष ठेवून असल्याचे पथकाच्या लक्षात आले, त्या नंतर सूरज याला अटक करून अधिक तपास केला असता हा सर्व प्रकार त्यानी केल्याचे उगड झाले, या तपासता सुरुज जवळ 82 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांना मिळून आली तर गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल देखील पोलिसांना मिळून आली असा एकूण 1 लाख 22 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य तीन मित्राचा देखील शोध पोलिसांनी घेऊन त्यांना अटक केली आहे. 
Comments