प्रभाग क्रमांक १७ मधील सेक्टर १३ नवीन पनवेल येथील गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप....

पनवेल / प्रतिनिधी  :- श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल याच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १७ मधील सेक्टर १३ नवीन पनवेल येथील गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमास महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती सुशिला जगदिश घरत, नगरसेवक अँड  मनोज भुजबळ, नगरसेविका अँड वृषाली जितेंद्र वाघमारे, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे ,महिला मोर्चा शहर अध्यक्षा वर्षां नाईक, जगदीश घरत, अँड जितेंद्र वाघमारे, सचिन पाटील,जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, योगेश हाडगे, दुर्वेश शेटे, शोएल सैय्यद, अमोल घायाळ, अनिरूध्द कडवे, गुड्डू टाक, इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments