पनवेल शहर पोलिसांनी केला देशी दारुचा साठा हस्तगत....

पनवेल, दि. २१ (संजय कदम) ः पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने वरचा ओवळा डोंगराच्या बाजूला सेक्टर 1 परिसरात टाकलेल्या छाप्यात देशी दारु संत्रा गोल्ड जीएम असे लिहिलेल्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.
या परिसरात बेकायदेशीररित्या देशी दारुचा साठा केला जात असून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोरडे, पो.ना.नंदकुमार माने आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून अभिमन्यू प्रसाद (30) या पानटपरी व्यावसायिकाला ताब्यात घेवून त्याच्याकडून जवळपास 1352 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. व त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई केली आहे.
Comments