पनवेल, दि.29 (संजय कदम) ः शिवसेना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपते. आज कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते ना.सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रटर देण्यात येत असून आगामी काळात सुद्धा या रुग्णालयाला ज्या मदतीची अपेक्षा असेल ती पूर्ण करू असे आश्वासन खा.श्रीरंग बारणे यांनी आज दिले.
यावेळी खा.श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तालुका संघटक रामदास पाटील, उपजिल्हा युवा सेना अधिकारी अवचित राउत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सकपाळ, डॉ.बाबासाहेब काळे, डॉ.प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रटर वैद्यकीय साहित्य भेट डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात आले.