महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त युगपुरुष प्रतिष्ठानकडून सॅनीटायझरचे वाटप
नवी मुंबई / ( प्रतिनिधी) महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त युगपुरुष प्रतिष्ठान यांच्या तर्फे नवी मुंबईतील विविध भागातील सफाई कर्मचारी, बिगारी कामगार, रिक्षा, टॅक्सी चालक यांना सेनेटायझरचे वाटप  करण्यात आले.

                 या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री नयन पवार यांची विशेष मान्यवर म्हणून उपस्थिती होती. तसेच डॉ. शितल सातपुते,  विरेंद्र म्हात्रे, युगपुरुष प्रतिष्ठानचे संस्थापक अजित खताळ, युगपुरुष प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश तायडे , विक्की वांडे, वीरेंद्र लगाडे, दिलीप आमले, प्रकाश खलाटे, इम्रान नाईक व युग प्रतिष्ठनातील सर्व सभासद उपस्थित होते.
Comments