प.बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून जाहीर निषेध; माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट -विक्रांत पाटील

पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः सध्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंगालमध्ये अमानुष हिंसाचार सुरू आहे, बंगाल जळत आहे आणि विजयाचा उन्माद डोक्यात गेल्याने ममता बॅनर्जी हे मुकसंमत्तीने बघत आहेत. या माणुसकीला काळीमा फासणार्‍या गोष्टीचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पनवेल येथे केला. 
यावेळी त्यांच्यासह भाजप नेते तथा कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांची ही प्रमुख उपस्थिती होती. ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यत्यांवर तसेच कार्यालयावर भ्याड हल्ल्याची मालिका चालवली आहे. दिवसाढवळ्या मुडदे पाडले जात आहेत आणि ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. याचा निषेध करत निवडणुकीचा विजय ममता बॅनर्जींच्या डोक्यात गेला असल्याची खंत विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली. प. बंगालच्या विजयावर जणू काही स्वतःच्याच घरी पाळणा हलला अशा आनंदात शुभेच्छांचा वर्षाव करणारे  स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील संधीसाधू नेते यावर प्रतिक्रिया का देत नाहीत? निषेध का करत नाहीत? की यांचा या हिंसाचाराला मुकपाठिंबा आहे? असा सवालही विक्रांत पाटील यांनी विचारला. मराठा आरक्षण विषयात राज्य शासनाचा निष्काळजीपणा समाजाला मारक ठरला आहे, असे विक्रांत पाटील म्हटले.फोटो ः भाजपकडून निषेध
Comments