लसिकरणासाठी गेलेल्यांच्या घरी चोरी...
लसिकरणासाठी गेलेल्यांच्या घरी झाली चोरी

पनवेल दि. 23 (संजय कदम):लसिकरणासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरीच चोरी झाल्याची घटना खारघर वसाहतीत घडली आहे.
          
खारघर वसाहतीत से.-12 येथे राहणारे गणपती वाडीघरे हे आपल्या पत्नीसह से.-15 याठिकाणी कोव्हीड लसीसाठी गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी सेफ्टी डोअरची कडी कापून आत प्रवेश केला व घरातील रोखरक्कम व दागिने असा मिळून जवळपास 70 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments