मोटार सायकलची चोरी...
मोटार सायकलची चोरी
पनवेल, दि.19 (संजय कदम) ः पनवेल जवळील कसळखंड येथील नवकार कंपनी गेटसमोर उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
नंदलाल तायडे (28) यांनी त्यांची 25 हजार रुपये किंमतीची एमएच-27-सीके-6150 ही सदर ठिकाणी उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटार सायकल चोरुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments