कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांच्या आरोग्याबाबतीत योग्य उपाययोजना करा - प्रितम म्हात्रे


पनवेल : कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेची पूर्व सूचना दिल्याने आगामी काळात नागरिकांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांच्या आरोग्याबाबतीत योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी राज्याचे मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री,  आरोग्यमंत्री, रायगड्च्या पालकमंत्री, पनवेल पालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

             संपूर्ण जगात आणि आपल्या भारत देशात कोरोनाने २०२० सालापासून हाहाकार माजविला आहे. सन २०२० साली सुरुवातीला देशात कोरोनाची पहिली लाट आली होती. पहिल्या लाटेत जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा सामना करावा लागला होता. तर आता २०२१ साली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवक आणि जेष्ठांना भयंकर त्रास होऊन अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. कुटुंबातील कर्ता गमावल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर तरुणांना सुद्धा या आजारांमध्ये आपले प्राण गमवावे लागल्याने नवविवाहित तरुणींना ह्या लहान वयात आपला श्रुंगार पुसावा लागला आहे. अनेक कुटुंबे उध्वस्त झालीत.

              आता कोरोनाची देशभरात तिसरी लाट येऊ पाहते. तज्ञ व्यक्तींनी  तिसऱ्या लाटेचा त्रास लहान मुले आणि नुकतीच प्रसुती झालेल्या मातांना होणार आहे असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पूर्व खबरदारी म्हणून लहान मुलांच्या आरोग्य तज्ञांच्या सोबत चर्चा करून त्या प्रकारे आरोग्य यंत्रणेचे योग्य नियोजन करून लहान मुलांचे कोविड हॉस्पिटलकोविड सेंटरओपीडी सेंटर सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. पनवेल महानगरपालिकेने गंभीरतेने विचार करावा आणि तातडीने ठोस पावले उचलावी अशी सूचना विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आयुक्तांना केली आहे.


Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image