३,०८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून रिक्षा, लॅपटॉप तसेच मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 3 लाख 8 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील बालाजी ऑटो मोबाइल समोर, नंदनवन सोसायटी पनवेल येथ पार्क करुन ठेवलेली सुझुकी एक्सेस मोटारसायकल क. एम.एच.46 क्यु.6920 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तसेच गेल्या काही दिवसापासून वाहनचोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त बीपीन कुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त, नितीन भोसले-पाटील यांनी विशेष प्रयत्न करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना वपेानि अजयकुमार लांडगे यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनिरी सुनिल तारमळे, पोहवा नितीन वाघमारे, पोना परेश म्हात्रे, पोशि युवराज राऊत, पोना विनोद पाटील, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशि यादवराव घुले, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी व पोशि भगवान साळुंखे आदींचे पथक पनवेल परिसरात शोध घेत असताना तसेच सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे सदर गुन्हयातील 03 विधीसंघर्षग्रस्त बालकांना रोडपाली, कळंबोली ता. पनवेल, जि. रायगड येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडुन वरील गुन्हयातील मोटारसायकल व इतर गुन्हयातील मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला आहे.
त्यांचेकडुन पनवेल शहर, खारघर व सानपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 5 मोटार सायकल, ऑटो रिक्षा, 3 मोबाईल फोन, एक लॅपटॉप, 12 मोटार सायकलच्या चाव्या, एक बॅग असा एकूण 3 लाख 8 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
चौकट
सदर गुन्हयातील 03 विधीसंघर्ष बालक हे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांना बेवारस सापडलेल्या मोटारसायकलच्या चाव्या गोळा करुन जवळ ठेवतात. रात्रीच्या वेळेस फिरुन ज्या मोटारसायकला चावी लागेल ती मोटारसायकल चोरी करतात. सदर चोरी केलेल्या मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यानंतर बेवारस सोडुन देतात. तसेच रहीवाशी सोसायटयांमधील वॉचमन झोपल्यानंतर चार्जीगला लावलेले मोबाईल फोन चोरी करतात असे तपासात निष्पन्न झाले आहे.
या आरोपींना 3 विधीसंघर्षग्रस्त बालकांना आज रोजी मा.बाल न्याय मंडळ, कर्जत यांचेसमक्ष हजर करुन बाल निरीक्षण गृह कर्जत येथे रवाना केले आहे.
फोटो ः पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल