कारच्या धडकेत दुचाकीचालक जखमी, गुन्हा दाखल...


नवीन पनवेल :  कारच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झाला आहे. तळोजा पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विचुंबे येथील शंकर विठोबा पिलानी हे आणि त्यांचे मित्र अमोल पांचाळ हे त्यांचे क्टिवा कार एमएच 46 बीएल 797 घेऊन खारघरला गेले होते. ते खारघर मुंब्रा पनवेल रोडने विचुंबेला घरी जात असताना नावडे ब्रिजखाली त्यांना एका चार चाकी कारने धडक दिली. यात अमोल पांचाळ हा जखमी झाला असून कार चालक पळून गेला आहे. 

Comments