तीन तोतया पोलिसांनी महिलेला दिड लाखांना लुबाडले...


पनवेल , दि.22 (संजय कदम)- पोलिस असल्याची बतावणी करून तिघ तोतया पोलिसांनी एका महिलेकडून जवळपास दिड लाखांचे दागिने लुबाडून नेल्याची घटना कळंबोली वसाहतीत घडली आहे.
          लोचना जगदाळे (वय-52) डिमार्टला खरेदीसाठी जात असताना तिघा भामट्यांनी त्यांना अडविले व आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांच्याकडील दागिने काढायला सांगून सदर दागिने पिशवीत बांधून देण्याच्या बहाण्याने आपल्याकडे घेऊन त्या तिघांनी हात चलाखीने दागिने चोरले त्यानंतर पिशवी जगदाळे यांना देऊन पलायन केले. काही वेळाने त्यांनी पिशवी उघडून बघितली असता त्यात दागिने आढळून आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्याने याबाबतची तक्रार कळंबोली पोलिस ठाण्यात केली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image