पनवेल, दि. २० (वार्ताहर) ः महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातर्फे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार श्रीमती.मिरा तातोबा बनसोडे यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती.मिरा बनसोडे या नवी मुंबई पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. शासानातर्फे जारी करण्यात आलेल्या पदोन्नती यादीमध्ये त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली असून त्या सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.