वेद फाऊंडेशन चित्रकला स्पर्धा समितीत पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांची नियुक्ती.....
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः वेद फाउंडेशन या नोंदणीकृत संस्था द्वारा आयोजित माझे आवडते चित्र या स्पर्धेच्या आयोजन समिती सदस्यांची नुकतीच मुंबईमध्ये घोषणा करण्यात आली. यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर समितीमध्ये सचिव सौ माधुरी कुलकर्णी, सदस्य उत्तम तरकसे, यांसमवेत सौ मंजू सराठे, विलास देवळेकर, मंगेश रासम, सौ नम्रता मटकर, सौ सोनल गांधी या निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माझे आवडते चित्र या उपक्रमामध्ये 3 देशातील दोनशेहून अधिक बालके, तरुणी, दिव्यांग तथा विशेष व्याधीग्रस्त बालकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. संस्था अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी सदर समितीची घोषणा करताना या उपक्रमाद्वारे अनेक नवोदित कलाकारांना तथा चित्रकारांना प्रोत्साहन मिळेल व विविध शहरातील खेड्यातील चित्रकारांना परदेशात आपली कला दाखविण्याची संधी उपलब्ध होईल असे मत व्यक्त केले.
फोटो ः उत्तम तरकसे
Comments