तळोजा पोलीस ठाणे स्माईल फाऊंडेशन, सेवा सिरमन जनता सेवा जथा व गुरुद्वारा यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल, दि.3 (संजय कदम) ः  तालुक्यातील देवीचापाडा हद्दीतील नागरिकांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्माईल फाउंडेशन,  सेवा सिमरन जनता सेवा जथा, कोपरखैरणे व बेलापूर गुरुद्वारा यांचे सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम देवीचा पाडा, गावदेवी मंदिराच्या मोकळ्या  मैदानात आयोजित करण्यात आला होता.  देवीचापाडा  परिसरातील गरीब, मोलमजुरी व बिगारी काम करणारे गरजू 300 नागरिकाना 15 दिवस पुरेल इतक्या अन्नधान्यचे   पॅकेटाचे (तांदूळ,  डाळ,  हळदी पावडर पॅकेट,  लालमिर्ची पावडर पॅकेट, मीठ, तसेच कांदा व बटाटा) वाटप करण्यात आले. सदर अन्नधान्य पॅकेटाचे वाटप  शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, पनवेल विभाग, तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण, स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धीरज आहुजा, कवलजित सिंग, संदीप सिंग, गुरुप्रीत सिंग, गुरुजींत सिंग,  हरपाल सिंग यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमावेळी सोशल डिस्टनिग, मास्क, सॅनिटायझर वापरणे इ. नियमाचे पालन करण्यात आले.फोटो ः पोलिसांतर्फे जीवनावश्यक वस्तूंंचे वाटप
Comments