पनवेल, दि.५ (संजय कदम) ः महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची विक्री करण्यास बंदी असतानाही बेकायदेशीररित्या साठा करून त्याची विक्री करणार्या दोघा भावांना कामोठे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाई ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास 33 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी तंबाखू व पानमसाला या अन्न पदार्थाची वाहतूक व विक्रीसाठी प्रतिबंध असल्याचे माहिती असताना देखील बेकायदेशीररित्या मानवी शरीरास घातक व लोकजिवीतास धोका निर्माण करणारे प्रतिबाधीत अन्न पदार्थाची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने कामोठे जवळील नौपाडा गाव येथे नवरंग किराणा दुकानात सवाईसिंग राजपूत (33) व अर्जूनसिंग राजपूत (30) या दोघांनी सदर प्रकारचा माल ठेवून त्याची विक्री केल्याची माहिती वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज राऊत व पथकाने या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता 1860 चे कलम 328, 272, 273, 188 सह सुरक्षा मानके कायदा कलम 26, 27 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली आहे.